cleaningofkrishnariverbyboatfromkaradmunicipality

esahas.com

कराड पालिकेकडून बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता

येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता केली. यामध्ये नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच नदीपात्रालगत झाडा-झुडपांमध्ये  अडकलेला प्लास्टिकसह अन्य कचराही काढण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.