कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत नदीपात्रामध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला.
सातारा : कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत नदीपात्रामध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ जानेवारी २०२२ रोजी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात तीस ते पस्तीस वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खबर कोडोली येथील पोलीस पाटील राजेंद्र भोईटे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


