maharashtra

सातारा शहर परिसरातून एकाच दिवशी दोन दुचाकी लंपास


Two two-wheeler stolen on the same day from Satara city area
सातारा शहर परिसरातून एकाच दिवशी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरातून एकाच दिवशी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ डिसेंबर रोजी १ ते ७ वाजण्याच्या दरम्यान समर्थ नगर, कोडोली, ता. सातारा येथील आशा कॉलनीमधील बिल्डिंगच्या पार्किंगमधुन अज्ञात चोरट्याने एम.एच. ५० जी. १०९३ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संदेश सुरेश वीर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अन्य एका घटनेत दि. २९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान सातारा बस स्थानकातील पार्किंगमधुन अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ सीसी ८६७५ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमोल दिलीप जाधव, रा. खिंडवाडी, ता. सातारा यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली.