सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ डिसेंबर रोजी आठ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावातील एक महिला तिच्या घरात स्वयंपाक करत असताना तिचे तोंड दाबून आनंद संपत काळे, संकेत आनंद काळे, शाहीर शर्मा भोसले सर्व रा. रेवडी, ता. सातारा आणि नितीन शेखसाहेब भोसले राहणार मोरगाव सुपे, जि. पुणे यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत या चौघांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


