खिंडवाडी, ता. सातारा येथील राहत्या घरातून एटीएम कार्ड चोरून अज्ञात चोरट्याने २ लाख १० हजार ३४२ रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : खिंडवाडी, ता. सातारा येथील राहत्या घरातून एटीएम कार्ड चोरून अज्ञात चोरट्याने २ लाख १० हजार ३४२ रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान खिंडवाडी, ता. सातारा येथील शिवाजी साहेबराव चव्हाण, वय ६५ त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने युनियन बँकेचे एटीएम कार्ड चोरुन २ लाख १० हजार ३४२ रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


