पाठलाग करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुरज पवार, रा. श्रीराम कॉलनी, दौलत नगर, करंजे, ता. सातारा याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : पाठलाग करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुरज पवार, रा. श्रीराम कॉलनी, दौलत नगर, करंजे, ता. सातारा याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ डिसेंबर रोजी साडेनऊ ते दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दौलत नगर, करंजे येथे व सातारा बसस्थानक परिसरात सुरज पवार याने दुचाकीवरून एका युवतीचा वेळोवेळी पाठलाग करून, तिच्याकडे एकटक पाहून, दुचाकीचा हॉर्न वाजवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार संबंधित युवतीने शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


