सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परजावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली आहे.
बेदरकारपणे रिक्षा चालवल्या प्रकरणी रिक्षा चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई-वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात खानापुर, ता.वाई येथील किशोर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही सातारा पोलिसांनी दाद दिली नाही. या कारणास्तव शुक्रवारी दुपारी सदर बाजार मधील लक्ष्मी प्रकाश डागा व प्रकाश डागा या दांम्पत्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्रातील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी केली आहे.
कुचेकर हॉस्पिटलच्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
गोडोलीत अज्ञात चोरट्यांनी एका युवतीचा मोबाईल स्नॅचिंग करुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका प्रवासी बस मधून अज्ञात चोरट्याने पंचवीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.