maharashtra

मोबाईल चोरट्यास अटक

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई

जबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्यास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपये किंमतीचे एकूण ६ मोबाईल जप्त केले. रोहन संजय माने (वय २२, रा. देगाव, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सातारा : जबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्यास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपये किंमतीचे एकूण ६ मोबाईल जप्त केले. रोहन संजय माने (वय २२, रा. देगाव, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील साईबाबा मंदीर ते अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल रस्त्याने एक युवती फोनवर बोलत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तिच्या जवळील मोबाईल हिसकावून ते पळून गेले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्याच्या अनुषंगाने तपास करताना संबंधित चोरट्यांची माहिती प्राप्त केली. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्याचे अन्य साथीदारासमवेत केला असल्याचे त्याने सांगितले. तसेच असेच चोरी केलेले मोबाईल अन्य साथीदारामार्फत मोबाईल रिपेअर करणारे दुकानामध्ये तसेच इतर तोंड ओळखीचे लोकांना विक्री केली असल्याचे सांगितले.
त्यावर एका मोबाईल रिपेअर करणारे युवकास ताब्यात घेतले असता त्याने देखील युवकांनी चोरी करून आणून दिलेले पाच मोबाईल पोलिसांचे ताब्यात दिले. असे एकूण ९० हजार रुपये किंमतीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. या चोरटयांनी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करंजे गावामध्ये देखील अशाच प्रकारे मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे. त्यांच्यांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष कचरे, संतोष घाडगे, मच्छद्रिंनाथ माने, इरफान मुलाणी, सचिन रिटे, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चौधरी करीत आहेत.