न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील शिक्षक विजय गुरव यांना पालकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या घटनेचा निषेध करणारे व विजय गुरव यांच्यासह इतर शिक्षकांना पाठिंबा देणारे निवेदन शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी व शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांना दिले.
सातारा : न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील शिक्षक विजय गुरव यांना पालकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या घटनेचा निषेध करणारे व विजय गुरव यांच्यासह इतर शिक्षकांना पाठिंबा देणारे निवेदन शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी व शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांना दिले.
जिल्ह्यातून आलेल्या विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतामध्ये या घटनेचा तीव्र निषेध केला. त्याचप्रमाणे शिक्षक व शाळा यांचे बरोबर आम्ही सर्वजण आहोत असे आश्वासित केले. शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त करत शाळेचे सर्व निर्णय विद्यार्थी व पालक यांच्या हितार्थ घेतले जातात व यापुढेही घेतले जातील असे म्हटले. आमचे कोणाशी वैयक्तिक हेवेदावे नाहीत. आमच्यासाठी, विद्यार्थी केंद्रबिंदू आहे असे मत व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना, सातारा मुख्याध्यापक संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


