शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस च्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी
धैर्यशीलदादा कदम : अन्यथा सातारा जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा दिला इशारा
महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील तरुणांसोबत घडलेला एक अनुचित प्रकार यामध्ये राज्य सरकारने त्या काळात विधिमंडळाचा ठराव पास केला की राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.
सातारा : महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील तरुणांसोबत घडलेला एक अनुचित प्रकार यामध्ये राज्य सरकारने त्या काळात विधिमंडळाचा ठराव पास केला की राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. अशा प्रकारे तरुणांच्या आशांना पाणी फिरवण्यात आलं. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज पोवई नाका, सातारा येथे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळी भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, नगरसेवक धनंजय जांभळे, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, उपाध्यक्ष नितीन कदम, चिटणीस सुनील जाधव, तालुका अध्यक्ष गणेश पालखे, हेमंत शिंदे, अमोल कांबळे, शैलेंद्र कांबळे, विकास बनकर, विक्रम बोराटे, रवींद्र आपटे, भीमराव लोखंडे, रणजित फाळके, चेतन घाडगे, सुनील भोसले, राज सोनवले, सुनील शिंदे, अविनाश खार्शिकर, महेश निकम, युवराज मोरकर, दामिनी सपकाळ, हेमांगी जोशी, वनिता पवार, नजमा बागवान, मनीषाताई पांडे, प्रिया नाईक, महिला मोर्च्या शहराध्यक्ष रीना भणगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस च्या नेत्यांनी जनतेची माफी मागितली नाही तर आणखीन मोठे आंदोलन उभारू आणि या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिला.


