maharashtra

तालुकास्तरावर काँग्रेस पक्ष मजबूत करा

आगामी निवडणुकांची तयारी सुरू करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुकास्तरावर काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडल कमिटी, आणि ग्रामसमित्या एक स्थापन करून प्रत्येक आठवड्याला दोन जिल्हा परिषद गटात बैठका घ्याव्यात. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.

सातारा : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुकास्तरावर काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडल कमिटी, आणि ग्रामसमित्या एक स्थापन करून प्रत्येक आठवड्याला दोन जिल्हा परिषद गटात बैठका घ्याव्यात. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महीला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, ॲड. विजयराव कणसे, बाबासाहेब कदम, अजित पाटील-चिखलीकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, निवास थोरात, रजनीताई पवार, प्राची ताकतोडे, विद्या थोरवडे, नीलम येडगे, छायादेवी घोरपडे, गिंताजली थोरात, रफिक बागवान, संदीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा काँग्रेसने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. बूथ कमिटी, मंडल कमिटी आणि ग्रामसमिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी, निरीक्षक यांनी जबाबदारीने व झोकून देऊन काम करावे. त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी असून ती त्यांनी पार पाडावी. जिल्हा काँग्रेसने गेल्या दहा दिवसात पक्ष संघटना वाढीसाठी तीन बैठका घेऊन ज्येष्ठ नेते व तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांची पायाभरणी सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी लक्ष घातल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. तसेच पक्ष संघटनाचा भाग म्हणून महिला आघाडी, युवक काँग्रेस, सेवादल या आघाड्याची तर ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि अनुसूचित जाती जमाती सेल यांची पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.