सातारा तालुक्यातील मालगाव येथे शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात एक तरस अडकले होते. या तरसाची मुक्तता सातारा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून त्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा तालुक्याच्या जंगली भागात काही शिकारी वन्यप्राण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी फासे टाकत आहेत, अशा शिकाऱ्यांचा वन विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
किरण माने यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे तिनवेळा वाॅर्निंग देऊन मग सिरियलमधून काढण्यात आले. परंतु त्यांनी त्याचा राजकीय स्टंट केल्याचा आरोप 'मुलगी झाली हो' या मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाने यांनी केला आहे.
सातारा : सातारा शहराच्या जवळच असलेल्या सोनगाव येथे अनेकदा बिबटय़ाचे दर्शन झाले आहे. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये बिबट्याने सोनगाव येथील कदमवस्तीतील दहा कोंबडय़ांचा फडशा पाडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठय़ांतील गुरे वाचली. याबाबत वनविभागाकडे माहिती कळवली असल्याचेही त्यांनी सांगितले. बिबट्याचे ठसेही याठिकाणी आढळून आले आहेत.सोनगाव, कुरणेश्...
कामथी, ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.
सातारा शहरातील रस्त्यांवर नवीन इमारतीची बांधकामे सेटबॅक न सोडता झाली आहेत. शहराच्या पश्चिम भागात मंगळवार पेठेत काही बिल्डरांनी पालिकेच्या शहर विकास विभागाला हाताशी धरून वर्दळाचे रस्ते तीन मीटरनी गिळंकृत केले आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणामुळे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकांनद जयंती निमित्त शिवशक्ती तरुण मंडळातर्फे हाँटेल राजुरी जंक्शन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १६० जणांनी रक्तदान केले.
महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड पालीच्या खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी संपन्न झाले.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 15 रोजी त्यांच्या स्मृतीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.
ओंड शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार यावर्षी ओंड गावचे युवा उद्योजक संतोष सुतार यांना जाहीर झाला होता. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख प्रा. दिनकरराव थोरात यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.