सातारा जिल्हा पोलीस व गुरुकुल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने सातारा शहरात निर्भय निर्भया फलक उभारण्यात आले आहेत. गुरुकुल शाळा परिसरातील निर्भया पथक फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात आली आहे.
सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई' संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी म्हसवे, (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हलेंटाईन डे ' साजरा करण्यात येणार आहे.
कराड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.
मुंबईतील एका महिलेच्या मुलीला एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळवून देतो असे सांगून पाच वर्षांपूर्वी तब्बल ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील एक आणि सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आय. एस. एन. आर. या कॉलेजचे प्रमुख देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
येथील रविवार पेठेत असणाऱ्या धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक एका विद्यार्थ्याला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन पांडुरंग सोडमिसे, वय ४०, रा. रविवार पेठ सातारा त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर घेतलेल्या ट्रक्सचे हप्ते थकल्यानंतर, ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून, ट्रक्स घेऊन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सातारा शहर पोलीसांनी केला आहे. या टोळीने महराष्ट्र, गुजरातमध्ये अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एप्रिल २०२१ पडलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी सहा जणांपैकी पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
सातारा पालिकेने शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने काही रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. मात्र, शुक्रवारी गुरुवार पेठेतील चकाचक रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे डांबरीकरण न करता चांगल्या रस्त्यावर पैशांची उधळपट्टी कशासाठी? असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक हस्तकला कारागिरांची साठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यात येईल. त्याकरिता केंद्र शासनाच्या सर्व लागू योजना जिल्ह्यात राबविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले .
बामणोली, ता. जावली येथील कोयना तथा शिवसागर जलाशय सांबर या वन्यप्राण्याने चक्क पोहत पार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाले. यावेळी जलाशयात बोटीमधून सफर करणाऱ्या पर्यटकांनी आपल्या कॅमेरे, मोबाइलमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद केला. एवढेच नव्हे तर त्या सांबराला कोयना जलाशय पोहत पार करण्यासाठी मदत केली.