येथील रविवार पेठेत असणाऱ्या धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक एका विद्यार्थ्याला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन पांडुरंग सोडमिसे, वय ४०, रा. रविवार पेठ सातारा त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील रविवार पेठेत असणाऱ्या धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक एका विद्यार्थ्याला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन पांडुरंग सोडमिसे, वय ४०, रा. रविवार पेठ सातारा त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास रविवार पेठ येथील धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक असणाऱ्या पार्किंगमध्ये समाधान महादेव मोरे, वय २९, रा. रविवार पेठ, सातारा हा आपली दुचाकी पार्किंग करत असताना त्याठिकाणी नितीन सोडमिसे आला. सोडमिसे याने मोरे त्याच्याकडे पार्टी करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. मोरे याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर सोडमिसे याने त्याला जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्याला चुन्याच्या निवळीत टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सोडमिसे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.


