शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एप्रिल २०२१ पडलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी सहा जणांपैकी पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
सातारा : शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एप्रिल २०२१ पडलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी सहा जणांपैकी पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ एप्रिल २०२१ शिवथर ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉललगत मित्रासोबत अजित निकम हे बसले होते. यावेळी ६ अज्ञात इसमांनी दोन दुचाकीवरून येऊन कोयत्याच्या लाकडी मुठीने डोक्यात मारहाण करून त्याच्यासह मित्राच्या गळ्याला कोयता लावून दहशत माजवली होती. शस्त्रांचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील दोन मोबाइल हॅन्डसेट, एक मनगटी घड्याळ व रोख रक्कम १ लाख ६२ हजार रूपये असा एकून एक लाख ७३ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दि. २० एप्रिल २०२१ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दरोडेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तशा सूचना करून त्यांचा शोध घेण्यास सांगितले होते. संबंधित संशयितांची माहिती काढून गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की संबंधित दरोड्यातील संशयित सातारा जिल्ह्यासह बारामती येथील आहेत.
दि. १० फेब्रुवारी रोजी या ६ संशयितांना पैकी सचिन गब्बर भोसले, वय २१, रा. मालगांव ता. सातारा, हरिष पिताजी शिंदे , वय २६ , रा. पणदरे म्हसोबावाडी ता. बारामती, शेखर बाळु चव्हाण वय २४, रा. खामगांव साखरवाडी, ता. फलटण, गणेश शिवाजी कोकरे, वय २४, रा. पणदरे म्हसोबावाडी ता. बारामती, माकशा रंगा काळे, वय ३६, रा. सुरूर, ता. वाई या जणांना अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ सपकाळ, अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, प्रविण कांबळे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमोल माने, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, प्रविण पवार, विशाल पवार, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, नितीन गोगावले, वैभव सावंत, केतन शिंदे, धीरज महाडीक यांनी सहभाग घेतला.


