सांबर या वन्यप्राण्याने कोयना जलाशय केला पोहत पार
पर्यटकांनी लुटली दुर्मिळ क्षणांची पर्वणी
बामणोली, ता. जावली येथील कोयना तथा शिवसागर जलाशय सांबर या वन्यप्राण्याने चक्क पोहत पार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाले. यावेळी जलाशयात बोटीमधून सफर करणाऱ्या पर्यटकांनी आपल्या कॅमेरे, मोबाइलमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद केला. एवढेच नव्हे तर त्या सांबराला कोयना जलाशय पोहत पार करण्यासाठी मदत केली.
सातारा : बामणोली, ता. जावली येथील कोयना तथा शिवसागर जलाशय सांबर या वन्यप्राण्याने चक्क पोहत पार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आज व्हायरल झाले. यावेळी जलाशयात बोटीमधून सफर करणाऱ्या पर्यटकांनी आपल्या कॅमेरे, मोबाइलमध्ये हा दुर्मिळ क्षण कैद केला. एवढेच नव्हे तर त्या सांबराला कोयना जलाशय पोहत पार करण्यासाठी मदत केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बामणोली येथून काही पर्यटक बोटीमधून वासोटा किल्ल्याच्या दिशेने कोयना जलाशयामधून जात असताना अचानक एक सांबर कोयना जलाशय पोहत पार करत असल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनास आले. पर्यटकांनी कोणताही गोंधळ न करता आपल्या जवळील कॅमेरे, मोबाइलमध्ये हा सुवर्णक्षण कैद केला. एवढेच नव्हे तर पोहत जाणाऱ्या त्या सांबराला कोणताही उपद्रव होणार नाही याची काळजी घे कोयना जलाशय पार करण्यासाठी मदत केली. दुपारनंतर सोशल मीडियावर पडलेल्या या व्हिडिओचे अत्यंत कौतुक होत असून या घटनेच्या निमित्ताने कोयना अभयारण्यामध्ये अद्यापही वन्यजीव अबाधित आहेत, हेच या घटनेवरून स्पष्ट होते. कदाचित त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून वासोटा किल्ला, नागेश्वरी येथे देशातून फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.


