maharashtra

पोक्सो कायद्यांतर्गत एकास 10 वर्ष सक्तमजुरी व दंड


10 years hard labor and fine under Pokso Act
कराड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.

कराड : कराड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकास १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.
कराडच्या सहजिल्हा न्यायाधिश श्रीमती होरे यांनी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख रा. सिद्धेश्‍वर कुरोली ता. खटाव याला दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आर. सी. शहा यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी होस्टेलमध्ये असताना आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख हा तिला भेटण्यास गेला. तसेच तिला कास पठार येथे फिरविले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीने लग्नानंतर जवळीक ठेवू, असे सांगून त्यास नकार दिला. त्यानंतरही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली.
याबाबत पिडीत मुलीने कराड पोलीस ठाण्यात 11 जुलै 2019 रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयित आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याच्यावर लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा खटला कराड येथील विशेष न्यायाधीश व जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.के.एस. होरे यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सरकार फिर्यादी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासले. विशेष व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद व पिडीत मुलीचे आई, वडील यांच्या साक्षी पुरावे व वैद्यकीय अहवाल डॉक्टरांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीशांनी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याला दोषी धरून वेगवेगळ्या कलमान्वये पोक्सो कायद्यांतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.
याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर. सी. शहा यांनी काम पाहिले. तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अमृता रजपूत, सहाय्यक फौजदार चेतन मछले यांनी तपास करून कोर्टामध्ये दोषारोप पत्र सादर केले. तसेच त्यास मदत करणारे पोलीस हवालदार गोविंद माने व अशोक मदने यांनी सहकार्य केले.