maharashtra

पारंपारिक हस्तकला कारागीर यांसाठी मध्यवर्ती सुविधा केंद्र

खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

Central Facility Center for Traditional Craftsmen
सातारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक हस्तकला कारागिरांची साठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यात येईल. त्याकरिता केंद्र शासनाच्या सर्व लागू योजना जिल्ह्यात राबविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले .

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक हस्तकला कारागिरांची साठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यात येईल. त्याकरिता केंद्र शासनाच्या सर्व लागू योजना जिल्ह्यात राबविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले .
उदयनराजे यांनी शुक्रवारी नारायण राणे यांची सातारा जिल्ह्यातील असंघटित व लघुउद्योग क्षेत्राच्या विकासाकरिता विशेष पॅकेज द्यावे, या मागणीसाठी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.
सातारा जिल्ह्यातील पारंपारिक कला कारागिरांना प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू करणे व केंद्रीय लघु व मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना भरीव निधी उपलब्ध करून देणे या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसे प्रस्ताव सादर करण्या ची सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. केंद्र शासनाच्या जास्तीत जास्त योजना सातारा जिल्ह्यात राबवल्या जाव्यात आणि सुशिक्षित बेरोजगार व होतकरू तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शन मिळावा व्यापक स्तरावर आयोजित केला जावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नारायण राणे यांनी लघु उद्योजक मेळावा आणि केंद्रीय उद्योजक विकास यादी जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्राची प्रत खासदार उदयनराजे भोसले यांना भेट दिली.