महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

कराडसह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.

esahas.com
महाराष्ट्र

राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नाही

श्रीमंत छ. स्व. सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छ. स्व. चंद्रलेखाराजे भोसले यांनी सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे चालवला. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे, असे सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छ. वृषालीराजे भोसले यांनी सध्या राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले.

esahas.com
महाराष्ट्र

राजधानी सातारा नगरीत छत्रपती शिवरायांना अभिवादन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राजधानी साताऱ्यातील माहोल शिवमय झाला. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांचा निनाद सुरू होता. सज्जनगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, रोहिरेश्वर या किल्ल्यांवरून शिवज्योत नेण्याची लगबग सुरू होती. शाहूनगरीने शिवजयंतीच्या निमित्ताने साक्षात शिवकाल अनुभवला.

esahas.com
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात : ॲड. यशोमती ठाकूर

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या चरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण करून महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे.

esahas.com
महाराष्ट्र

उंडाळेच्या व्यासपीठावरून समाजबांधणीचे मोठे काम

थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलासकाकांनी सुरू केलेले उंडाळेचे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

किल्ले सुंदरगडावर शिवजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा

किल्ले सुंदरगडावर (दात्तेगड) शिवजन्मोत्सवासह शिवयात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषातील शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन हारफुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवप्रतिमा ठेवून छत्रपतींचा सामुहिक पाळणा म्हटला. यावेळी शिवमावळ्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देऊन गडावर शिवकालीन वातावरण तयार केले.

esahas.com
महाराष्ट्र

कराड शहरात लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे जळून खाक

शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 20 ते 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गोसाव्याचीवाडी येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन; चौघांवर गुन्हे दाखल

गोसाव्याचीवाडी, ता. खटाव येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तेथीलच चौघांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथे अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

गावी गेलेल्या आईला सकाळी फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सातारा येथील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

esahas.com
महाराष्ट्र

नागठाणे येथील व्यापाऱ्याची दोन लाख रुपयांची फसवणूक

फरशी खरेदी करण्याकरता बँकेच्या अकाऊंट मोबाइलद्वारे ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे दोन लाख रुपये पाठवूनही फरशीची ऑर्डर पूर्ण न करता नागठाणे, ता. सातारा येथील एका व्यापाऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली.