maharashtra

कराडातील जळीतात सुमारे साडे चौदा लाखांचे नुकसान

१४ घरांना झळ : पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू, जळीतग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

Karad fire incident
येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

कराड : येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या आगीसंदर्भात संबंधित महिलांनी शनिवारी १९ रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रविवारी २० रोजी पोलिसांनी काही लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
येथील न्यायालय, बापूजी साळुंखे पुतळा, चर्च, व बिरोबा मंदिर याच्या मध्यावर असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यातच ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे कराड शहर हादरले होते. या आगीत १४ घरे जळाली असून बाजूच्या नगरपालिकेच्या काही दुकानगाळ्यांचेही आगीत नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी त्यामध्ये सुमारे साडे चौदा लाखांचे नुकसान झाले आहे. आगीतून जिव वाचवण्यासाठी संबंधित महिला केवळ अंगावरील कपडयानिशी बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे पत्र्यांच्या घरांसह घरातील कपडे, भांडी, धान्य, टिव्ही, रोख रक्कम, दागिने आदी. साहीत्य आगीत जळुन खाक झाले आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, महसुल विभागाच्या वतीने मंडलअधिकारी महेश पाटील व तलाठी सागर पाटील यांनी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरांचे पंचनामे केले. यामध्ये १४ घरांचे सुमारे साडे चौदा लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच वस्तीच्या बाजूस असलेल्या नगरपालिकेच्या काही दुकान गाळयांचेही आगीत नुकसान झाले आहे. या गाळ्यांचे सोमवारी पंचनामे करण्यात येणार असल्याचे तलाठी सागर पाटील यांनी सांगीतले.
तहसिलदार विजय पवार यांच्या माध्यमातुन जळीतग्रस्तांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. तर काही सामाजीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुनही त्यांना  चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या माध्यमातुन अध्याप जळीतग्रस्तांना ताडीची मदत मिळालेली नाही. त्यामुळे ही मदत टात्काळ मिळावी, अशी मागणी जळीत ग्रस्तांकडून होत आहे.