येथील वाढे फाटा परिसरात पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून ११ हजार ७९५ रुपये रोख रक्कम जुगाराचे साहित्य व चार मोबाईल हस्तगत केले.
सातारा : येथील वाढे फाटा परिसरात पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून ११ हजार ७९५ रुपये रोख रक्कम जुगाराचे साहित्य व चार मोबाईल हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील वाढे फाटा परिसरात असणाऱ्या शिवतेज हॉटेलच्या आडोशाला मोकळ्या जागेत दादा प्रकाश आवटे, रा. शनिवार पेठ, सातारा, श्रीकांत लक्ष्मण पाटील रा. पाटखळ, रोहन विलास नलावडे रा. वाडे, लक्ष्मण साहेब राव चव्हाण रा. पाटखळ, देवराज अंतुले रा. सदरबझार, सातारा, पुरुषोत्तम यशवंत सिताफे, रा. सातारारोड, ता. कोरेगाव, चंद्रमणी आगाणे, रा. शिवमनगर, गोडोली, सातारा हे जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून ११ हजार ७९५ रुपये रोख रक्कम जुगाराचे साहित्य व चार मोबाईल हस्तगत केले.


