maharashtra

रविवार पेठेतील अवैध दारु विक्रीवर कारवाई

5 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Action on illegal sale of liquor in Raviwar Peth
येथील रविवार पेठेतील अजय घाडगे उर्फ पांडा याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई करीत 5 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा : येथील रविवार पेठेतील अजय घाडगे उर्फ पांडा याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई करीत 5 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी सातारा बसस्थानक परिसरात अवैध दारुचा सुळसुळाट असल्याची बातमी 'साहस वार्ता'मध्ये झळकली होती. त्याच्याच अनुषंगाने मच्छी मार्केट, रविवार पेठ सातारा येथील एका पत्र्याच्या टपरीच्या शेडच्या आडोशास अवैध दारु विक्री सुरु असल्याबाबत माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी कारवाई करत 5 हजार 920 रुपये किंमतीच्या देशी दारु तसेच विदेशी दारु असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या एकूण 67 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी अजय घाडगे उर्फ पांडा रा. रविवार पेठ सातारा याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.