महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायतीसह सर्वच निवडणुकांना सामोरे जावा

सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपली पाळेमुळे खोल रुजवली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडील इतिहासात शिवसेनेचे २ संचालक निवडून आले आहेत. हे त्याचेच द्योतक असून भविष्यात विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायती, नगरपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर सामोरे जावा अशा सूचना पर्यटनमंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या.

esahas.com
महाराष्ट्र

शिरवळ येथे डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी सहाजण जेरबंद

शिरवळ, ता. खंडाळा  येथील एका इमारतीच्या टेरेसवर रविवार दि. २० रोजी डोक्यात गोळी झाडून एकाचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलिसांनी सहा जणांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ १२ तासाच्या आतच हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून प्राथमिक तपासात आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे दिसून येते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

esahas.com
महाराष्ट्र

राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांचा दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय लाक्षणिक संप

नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना  लागू करावी यासह २८ मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत. या संपानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास मार्च २०२० मध्ये देशपातळीवर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com
महाराष्ट्र

निवृत्त अभियंता किसन शिर्के यांचे निधन

येथील कूपर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक व महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळातील निवृत्त अभियंता किसन हणमंत शिर्के (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिर्के यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

esahas.com
महाराष्ट्र

...आणि, खासदार उदयनराजे भोसले झाले भावूक

सातारा : Udayanraje Bhosale Emotional : शिवजयंतीनिमित्ताने (Shiv Jayanti) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल बोलताना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) भावूक झालेले पाहायला मिळालेत. त्या काळात  आपण जन्माला आलो असतो तर मावळा म्हणून धन्य झालो असतो, असे खासदार उदयनराजे म्हणाले. एवढे मोठ मोठे नेते बघितले. मात्र 300 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा असा मोठा जल्लोष पाहून ते खूप महान होते हेच द...

esahas.com
महाराष्ट्र

पसरणी घाटात खाजगी बसला आग

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला नागेवाडी फाट्यावर सोळा नंबर बस स्टॉप जवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

esahas.com
महाराष्ट्र

शिरवळमध्ये गोळी झाडून एकाचा खून

शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून झाला असल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

esahas.com
महाराष्ट्र

फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

वीज मीटरमध्ये छेडछाड करुन त्याद्वारे वीज चोरी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्याला मारहाण; दोघांवर गुन्हा

भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.