maharashtra

घराला आग लागल्याने एका महिलेचा भाजून मृत्यू


जाखणगाव येथील पट्टावस्ती येथे घराला आग लागून एका महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची फिर्याद सुनिल नामदेव राऊत (वय ३५ वर्षे) यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे.

पुसेगाव : जाखणगाव येथील पट्टावस्ती येथे घराला आग लागून एका महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची फिर्याद सुनिल नामदेव राऊत (वय ३५ वर्षे) यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे.
पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाखणगाव येथील पट्टावस्ती येथे काल रात्री घराला लागलेल्या आगीत झोपलेल्या जागीच श्रीमती सुभद्रा आनंदराव राऊत (वय ७५ वर्ष ) यांचा भाजुन खाक होऊन मृत्यू झाला आहे. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकले नाही. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस नाईक लुबाळ करीत आहेत.