maharashtra

सातारा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला


The marriage of a minor girl was stopped in Satara
येथील संगम नगर परिसरात एका मंगल कार्यालयात पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. दरम्यान दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्यांना देण्यात आले.

सातारा : येथील संगम नगर परिसरात एका मंगल कार्यालयात पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. दरम्यान दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात त्यांना देण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ फेब्रुवारी रोजी पोलिस अधिक्षक अजय बन्सल व त्यांच्या सहकाऱ्यांना चाईल्ड लाईनवरून माहिती मिळाली संगमनगर सातारा येथील श्रीनगर कॉलनीमध्ये असणार्‍या वेदभवन मंगल कार्यालय या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा आकाश बबन चव्हाण, वय २४, रा. जांभवाडी, पटेल चौक, सांगली याच्याशी विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांना ताब्यात घेऊन त्यांना विवाहापासून प्रवृत्त केले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता आमदे- मेणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग घेतला.