येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कूपर कॉलनी येथे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
नेर ता. खटाव येथील तलावात आजअखेर सरासरी 70 ते 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी उन्हाळ्यात मान्सून पूर्व पावसाने अद्याप ही हजेरी लावली नाही. त्यामुळे येरळा नदी लगतच्या नळ पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.
झाडे ही निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. म्हणूनच निसर्गातील सर्व झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य समजायला हवे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कृपया या मातीतल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पाणी योजनेत राजकारण आणू नका, असे कळकळीचे आवाहन माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेची निविदा तातडीने काढावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सातारा शहर परिसरात वास्तव्य करीत असणार्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल संपत देशमुख वय 32, रा. विलासपूर, ता. सातारा याला न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
येथील देगाव फाटा परिसरात प्रवासातून एका अनोळखी महिलेने 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभय प्रकाश साठे वय 27, रा. फॉरेस्ट कॉलनी समोर,विलासपूर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.