महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सोनाली दिपक जोशी (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दि. 17 रोजी उपचारासाठी दाखल केल्यानंतर 18 रोजी पहाटे त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

esahas.com
महाराष्ट्र

‘अग्निपथ’ योजनेवरुन सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर

‘अग्निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शिरवळजवळ ट्रकची वारकर्‍यांच्या वाहनाला जोरदार धडक

पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टॅम्पोने वारकर्‍यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्‍याचा मृत्यू झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यस्तरीय नेत्यांनी लक्ष दिल्यास भाजपा सत्तेवर येण्याची शक्यता?

ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

तिसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलनाची सांगता

साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे कोणतेही संमेलन घेताना काळाचा संदर्भ घेणे गरजेचे असते. आजच्या काळामध्ये विचार महत्त्वाचा आहे. सध्या अस्वस्थतेचे युग सुरू आहे आणि धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून केला जात आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

esahas.com
महाराष्ट्र

एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान : मंगला गोडबोले

माझ्या लिहिण्याच्या प्रवासात मासिकांची यंत्रणा प्रबळ होती. मासिकांमुळे मला मोठा वाचकवर्ग मिळाला आणि एक लेखिका म्हणून घडण्यात मासिक संस्कृतीचे मोठे योगदान आहे. मासिकांच्या योगदानाची मराठी समीक्षकांनी जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

esahas.com
महाराष्ट्र

संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर येथे मुतखड्यासाठीची शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास कदम

पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

esahas.com
महाराष्ट्र

पत्नीची दुचाकी पतीने चोरली

येथील मोळाचा ओढा परिसरातील शिंदे स्टील फर्निचरच्या पाठीमागे राहणाऱ्या पत्नीची दुचाकी तिचा पती प्रशांत सर्जेराव कीर्तीकुडाव (रा.कोडोली, सातारा) व त्याच्या एका अज्ञात साथीदाराने चोरून नेल्याची फिर्याद पत्नी निकिता प्रशांत कीर्तीकुडाव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भुईंज येथून दुचाकीची चोरी

भुईंज, ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.