चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी प्रमोद शामराव पाटील (वय 60, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 18 रोजी घडली आहे. तक्रारदार यांनी सोशल मिडीयावर जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन 50 हजार रुपये पाठवले होते.