maharashtra

संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर येथे मुतखड्यासाठीची शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास कदम


Success for kidney stones at Sanjeevani Hospital and Surgical Center: Dr. Ambadas Kadam
पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
डॉक्टर तन्मय मेहता सांगली येथील यूरोलॉजिस्ट यांनी व डॉक्टर पृथ्वीराज दोशी, तसेच डॉक्टर अंबादास कदम, डॉक्टर शिंदे व हॉस्पिटल स्टाफ या सर्व टीमने यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडण्यास सहकार्य केले.
पी सी एन एल एक अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. पूर्वी फक्त पुणे व मुंबई येथेच यशस्वीरित्या होणारी शस्त्रक्रिया आज पुसेगाव सारख्या ग्रामीण भागांमध्ये संजीवनी हॉस्पिटल आणि सर्जिकल सेंटरच्या अत्याधुनिक ऑपरेशन थेटर मुळे यशस्वीरित्या पार पडली. पेशंटला पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथे न जाता पुसेगाव मध्येच यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा होणारा अनाठायी वाहन खर्च व इतर खर्च वाचणार आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापासून ही रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा मिळण्यासाठी मदत होणार आहे.