maharashtra

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

सातारा येथील धक्कादायक प्रकार; पती ताब्यात

Murder by strangling wife on suspicion of character
येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कूपर कॉलनी येथे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

सातारा : येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कूपर कॉलनी येथे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शीला दादासो फाळके वय ३०, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा या हिचे दादासो फाळके याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता शीला फाळके ही घरातील बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर तिला घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेनंतर नातेवाइकांनी शीलाचा खून झाला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शीलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्यामुळे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना समजू शकला नाही. परंतु शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला. अशी तक्रार मोनिका जर्नादन साठे रा. सदर बझार, सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पती दादासो फाळके याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.प ती दादासो गणपत फाळके, सासू अरुणा गणपत फाळके, सासरे गणपत मारुती फाळके, दीर सागर गणपत फाळके सर्व रा. कूपर काॅलनी, सदर बझार, सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी हादरला
अनैतिक संबंधाच्या संशयातून वेलंग, ता. कोरेगाव येथे दत्ता नामदास याने आपल्या प्रेयसीचा खून करून दोन मुलांना विहिरीत ढकलून देऊन तिहेरी हत्याकांड केल्याच्या घटनेला काही तास उलटतात तोच सातारा येथील कूपर काॅलनी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जिल्हा पुरता हादरून गेला आहे.