येथील देगाव फाटा परिसरात प्रवासातून एका अनोळखी महिलेने 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील देगाव फाटा परिसरात प्रवासातून एका अनोळखी महिलेने 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी 11.45 वाजण्याच्या सुमारास शीतल इंद्रजीत देसाई, रा. भिमाशंकर नगर, किवळे, पुणे ही महिला सातारा येथील देगाव फाटा परिसरातून प्रवास करीत असताना समवेत बसलेल्या एका अनोळखी महिलेने 1 लाख 14 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 2 हजार रुपये रोख आणि 500 रुपये रुपये किमतीच्या चार साड्या असा एकूण 1 लाख 16 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


