maharashtra

पोक्सो प्रकरणी एकास 3 वर्ष सक्तमजुरी


3 years hard labor in Pokso case
सातारा शहर परिसरात वास्तव्य करीत असणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल संपत देशमुख वय 32, रा. विलासपूर, ता. सातारा याला न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सातारा : सातारा शहर परिसरात वास्तव्य करीत असणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल संपत देशमुख वय 32, रा. विलासपूर, ता. सातारा याला न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरी व 500 रुपये दंड दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी 4.15 वाजण्याच्या सुमारास सातारा शहराच्या उपनगरात वास्तव्य करीत असलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विशाल संपत देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वंजारी त्यांनी करून सातारा जिल्हा न्यायालय विशाल देशमुख याच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.
विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून तसेच अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ज्योती दिवाकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी विशाल देशमुख याला 3 वर्ष सक्त मजुरी व 500 रुपये दंड दंड न दिल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश पवार यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवलदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, एम.के. मणेर, पोलीस नाईक रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.