महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अर्जुन यादव खून प्रकरणातील सूत्रधारांना मुंबई येथून अटक

सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अॅट्रॉसिटी प्रकरणाचा तपास अधिकारी राजकीय दबावातून बदलला

आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दाखल असलेल्या अ‍ॅट्रोसिटी प्रकरणाचे तपास अधिकारी सरकार बदलताच राजकीय दबावाने बदलण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी महादेव पिराजी भिसे यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळावा यासाठी दाद मागितली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चाफळ भागातील एसटी सेवेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी

पाटण आगारामार्फत बदली करण्यात येणाऱ्या एसटी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी चाफळ भागातील एसटी सेवेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

लैंगिक काम करणाऱ्यांना शिक्षीत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला ज. धोटे, अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित  लैंगिक काम करणाऱ्यांना शिक्षीत करण्यासाठी  कार्यशाळा शिबीर जिल्हा न्यायालयातील रामशास्त्री सभागृहात संपन्न झाली.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा बिगुल वाजला

सातारा जिल्ह्यातील कमी अतिवृष्टीच्या कार्यक्षेत्रातील कराड, फलटण, वाई, रहिमतपूर आणि म्हसवड अशा पाच नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षांच्या भ्रष्ट्राचाराचा अहवाल शासनाकडे सादर

महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या महाबळेश्‍वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी शिवसेना युवासेना उप जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरुन माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्यधिकारी अमिता दगडे पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले होते.

esahas.com
महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणार विशेष तपासणी मोहिम

नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अतिवृष्टीत बेघर झालेल्या मागासवर्गीय कुटूंबाला घरकुल मंजूर

तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथे स्वछ्तागृहाची भिंत कोसळली

येथील प्रभाग क्रमांक १५ मधील गीतांजली विद्या मंदिरा शेजारील सार्वजनिक स्वछ्तागृहाची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथे जबरी चोरी

येथील एका डोळ्याच्या रुग्णालयापुढे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.