maharashtra

अर्जुन यादव खून प्रकरणातील सूत्रधारांना मुंबई येथून अटक

स्थानिक गुन्हे शाखेची मानखुर्द येथे कारवाई

Arresters of Arjun Yadav murder case arrested from Mumbai
सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सदरचा संवेदनशील गुन्हा उघड करून गुन्ह्यातील सर्व पाच आरोपींना अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
दिनांक 2 जुलै 2022 रोजी दुपारी साडेतीन वाजता सातारा शहरातील नटराज मंदिर परिसरात दोन अज्ञात इसमांनी अर्जुन यादव राहणार वाई या इसमाचा खून केला होता. सदर गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली होती. हा खून कोणी व कशासाठी केला या तपासाचे मोठ्या आव्हान सातारा पोलिसांसमोर उभे राहिले होते. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळाची पाहणी करून हा गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि गुन्हे शाखेचे एक तपास पथक तयार केले. याआधी चार जुलै रोजी पुण्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.
मात्र गुन्ह्यातील मूळ आरोपी अभिजीत शिवाजी मोरे व सोमनाथ बंडू शिंदे हे मात्र फरार होते. त्यामुळे त्यांना शोधण्याचे आवाहन होते. सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान धुमाळ यांना आरोपी शिंदे व मोरे हे दोघेही मुंबई येथील मानखुर्द येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे तत्काळ रवाना झाले व त्यांनी मानखुर्द येथे आरोपींच्या ठावठिकाण याबाबत माहिती प्राप्त करून दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली. या खून प्रकरणातील पाचही आरोपींना गजाआड करण्याची धडक कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस आमदार विश्वनाथ संकपाळ, आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने यांनी भाग घेतला.