पाटण आगारामार्फत बदली करण्यात येणाऱ्या एसटी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी चाफळ भागातील एसटी सेवेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आहे.
चाफळ : पाटण आगारामार्फत बदली करण्यात येणाऱ्या एसटी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांनी चाफळ भागातील एसटी सेवेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी केली आहे.
ऐन मान्सून काळात एसटी सेवांच्या वेळेमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थी हे जवळजवळ अर्धा तास उशिरा पोहोचत आहेत. चाफळ मधून उंब्रज तसेच चरेगाव येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाटण आगाराने चाफळ विभागात नवीन वेळापत्रक केल्यामुळे सर्वच फेऱ्या पंधरा ते वीस मिनिटे मागेपुढे होत आहेत. यामध्ये सकाळी उंब्रज वरून सुटणारी केळोली बस पूर्वी सव्वा सात वाजता सुटत होती. ती 6:45 केल्याने मुलांना बस वेळेत मिळत नाही. त्यामुळे या बसचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे करावे, अशी मागणी होत आहे. तसेच केळोली बसचा फेरा जो बंद केला आहे त्यामुळे ग्रामस्थांना केळोली फाट्यापर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे चाफळ येथे
विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नाहीत. तीच परिस्थिती चाफळहून उंब्रज, चरेगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची होत आहे. त्यामुळे वेळापत्रक न बदलता पूर्वीप्रमाणे एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.


