महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

दोन हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याचा मदतनीस जाळ्यात

सोनगिरीवडी आणि सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील तलाठी पांडुरंग जगन्नाथ भिसे, रा. फ्लॅट नंबर १०४, विराट नगर, वाई याच्या मदतनीस दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. याप्रकरणी तलाठी व त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गोवे येथून दुचाकी चोरीस

गोवे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

प्रतापसिंहनगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

प्रतापसिंहनगर (खेड), ता. सातारा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मेढ्याच्या माजी उपनगराध्यक्षाच्या दिवट्यावर बलात्काराचा दुसरा गुन्हा

मेढा, ता. जावली येथील मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांच्या दिवट्याने पुण्यातील एका महिलेवर म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला सातारा शहर परिसरातून अटक केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

केळवली धबधब्यात सातार्‍यातील युवक बुडाला

सातारा तालुक्यातील केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून युवकाचा शोध सुरु आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा तालीम संघ परिसरात आढळला युवकाचा मृतदेह

सातारा शहरातील तालीम संघ परिसरात घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून की आत्महत्या याबाबत पोलीस साशंक असून, शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समजू शकणार आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सातारा भेटीचे आमंत्रण

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयनराजे यांनी मुर्मू यांना सातारा भेटीचे आमंत्रण दिले.

esahas.com
महाराष्ट्र

ओबीसीच्या आरक्षणासाठी जिल्हयात गटारी अमावस्येचा मुहूर्त

राज्य निवडणूक आयोगाकडून गुरुवारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा, महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या आरक्षणासाठी गटारी अमावस्येचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी वीस रुपये मोजावे लागणार

चाफळ, ता. पाटण विभागातील सडावाघापूर येथील उलटा धबधबा प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन्  उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्याचा अभ्यास करून प्रलंबित प्रश्न सोडविणार

सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे खरोखर भाग्य आहे. सातारा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. सातारा जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या अंमलबजावणीचा माझा पुरेपूर प्रयत्न असेलम, अशी ठाम ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.