केळवली धबधब्यात सातार्यातील युवक बुडाला
पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल
सातारा तालुक्यातील केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून युवकाचा शोध सुरु आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील केळवली धबधबा या ठिकाणी एक युवक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून युवकाचा शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुल सुभाष माने हा युवक सातार्यातील विकास नगर या ठिकाणी राहणारा असून तो त्याच्या अन्य तीन मित्रांसह केळवली धबधबा या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पर्यटनासाठी गेला होता. मित्रांसोबत धबधब्यात पोहोत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडाला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्राने पाण्यामध्ये उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने राहुल माने हा बुडाला आहे. दरम्यान, काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्या राहुल मानेला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलीस आणि रेस्क्यू टीम कसोशीने प्रयत्न करत आहे. या घटनेने पर्यटनस्थळांवर पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक आणि सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. वनविभाग आणि जिल्हा पोलिसांकडून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर गस्त वाढवण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली. केळवली धबधब्यावर प्रेमी युगुले आणि तरुणाईचा निरंतर वावर असतो. सोयीची जागा असल्याने या धबधब्याला तरुण पसंती देतात. मात्र, सुरक्षेची बोंब असल्याने याठिकाणी या युवकाचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


