सातारा- सोलापूर राज्य मार्गावर असणाऱ्या संगमनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा मारून १ हजार १९० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
येथील मंगळवार पेठ परिसरातून पोलिसांनी एकाकडून दारू व रोख रक्कम जप्त केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा शहर व परिसरातून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
चार चाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करीत असताना पुसेगाव ते बुध या पोलीस स्टेशनच्या हद्दी दरम्यान पुसेगाव पोलिसांच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्यासह एकूण 2 लाख 25 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.
राजस्थान जालोर जिल्ह्यातील इंद्र मेघवाल यामुळे इतर समाजाच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांच्या ग्लास मधून पाणी पिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अमानुष घटनेचा साताऱ्यात रिपाई जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला.
गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने येथील तालीम संघ मैदानावर आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मित्र समूहाच्या वतीने सुनिल काटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.
सातारा शहर परिसरात एका युवतीचा रोहित कुंभार व त्याच्या दोन साथीदारांनी विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात विविध दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यार दुचाकीवरुन चोरुन हजारो रुपये किंमतीच्या 221 विदेशी दारुच्या बाटल्या घेवून जाणार्याला पोलिसांनी पकडले. विनोद विश्वास जाधव (वय 42, रा.वाघेश्वर ता.जावली) असे संशयिताचे नाव आहे.