maharashtra

अवैध दारू विक्रीप्रकरणी एकावर कारवाई


येथील मंगळवार पेठ परिसरातून पोलिसांनी एकाकडून दारू व रोख रक्कम जप्त केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : येथील मंगळवार पेठ परिसरातून पोलिसांनी एकाकडून दारू व रोख रक्कम जप्त केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोगदा ते यवतेश्वर जाणाऱ्या मार्गावर मंगळवार पेठ परिसरात तेथीलच विशाल बाळू चौगुले यांच्याकडून २ हजार ९७० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.