maharashtra

संगमनगर येथील जुगार अड्डयावर छापा


सातारा- सोलापूर राज्य मार्गावर असणाऱ्या संगमनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा मारून १ हजार १९० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

सातारा : सातारा- सोलापूर राज्य मार्गावर असणाऱ्या संगमनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा मारून १ हजार १९० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा - सोलापूर राज्य मार्गावर खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत संगमनगर येथील असणाऱ्या कॅनॉलजवळील टपरीच्या आडोशाला परमेश्वर प्रल्हाद अडागळे, रा. प्रतापसिंह नगर, ता. सातारा याच्याकडून १ हजार १९० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.