बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याची उकल बोरगाव पोलीस ठाण्याने 24 तासात करून तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 95 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कराड शहराच्या वाखाण परिसर येथे मोठी दुर्घटना घडली. अंडरग्राउंड ड्रेनेज साफ करत असताना नगरपालिकेचा एका कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर मदतीला गेलेला दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नगरपालिकेकडे अत्यावश्यक सोयी- सुविधा नसल्याने ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
कोरोना काळात रसातळाला गेलेला शेतकरी कसाबसा सावरतोय , तो पर्यंतच आले पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर खोडवा आल्याचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गडांतर आणले आहे.
राजघराण्याचे बारावे वंशज व शाहूनगरीचे माजी नगराध्यक्ष व राजघराण्याचा भक्कम आधारवड, कुशल मार्गदर्शक व मनोमिलनाचे शिल्पकार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय ७५) यांच्या निधनाने अवघा सातारा सुन्न झाला आहे. शोकाकुल वातावरणामध्ये संगम माहुली येथील राजघाटावर शिवाजीराजे भोसले यांच्यावर बुधवारी दुपारी पावणेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दमदाटी करून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार दारू अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी 6 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरात घुसून एकास मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.
साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं.
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.