वीज वितरण कंपनीसाठी जिल्ह्यामध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणारे 2800 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांपैकी शिरगाव, तासगाव, जिल्हा सांगली येथे राहणारा शंकर कळसे पाचवड तालुका खटाव येथे खांबावर चढला असता अचानक वीज पुरवठा चालू करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.
उत्तेकर नगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
एकास दमदाटी. शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वेळे येथे दि. 12 रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास पायी रस्त्या ओलाडणाऱ्या नारायण नामदेव जगताप वय 55, रा. रणदुल्लाबाद यांना एसटी बसने धडक दिली होती. त्या अपघात जगताप यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी एसटी बस चालक संतोष रत्नाकर गरवारे रा. हिंगणे, ता. खटाव याच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या समोर लावलेली दुचाकी दि. 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला. परंतु तब्बल 12 दिवस तो चोरटा पोलिसांना सापडला नाही. अखेर दुचाकी मालकाने अज्ञात चोरटय़ाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील रावडी येथे ऊसाच्या लागणीवरुन तिघांना मारहाण करण्यात आली. त्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना दि. 13 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन जणावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
सातारा शहर आणि मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीत दोन दुचाकीच्या झालेल्या अपघात प्रकरणी दोन जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही.
सातारा - लोणंद मार्गावर खाद्याचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रकची धडक महावितरण कंपनीच्या विजेच्या पोलला बसली. त्यामुळे विद्युत प्रवाह ट्रकमध्ये गेल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडूथ ता. सातारा येथे घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अंधार वाडी तालुका कराड येथील अधिक गोविंद जाधव वय 30 या युवकास अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षे कारावास व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.