उत्तेकर नगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : उत्तेकर नगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान उत्तेकर नगर येथील दत्त छाया अपार्टमेंट च्या पार्किंग मधून रवींद्र देवेंद्र पवार वय 43, राहणार खेड, तालुका सातारा यांची दुचाकी क्रमांक एमपी 09 एसई 3019 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


