maharashtra

विरमाडे येथील अपघात प्रकरणी दोघांवर गुन्हा


पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीत दोन दुचाकीच्या झालेल्या अपघात प्रकरणी दोन जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही.  

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील विरमाडे गावच्या हद्दीत दोन दुचाकीच्या झालेल्या अपघात प्रकरणी दोन जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही.  
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश इंदलकर याने दिलेल्या फिर्यादीवरुन दि. 10 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास विरमाडे गावच्या हद्दीत साहिल भरत दुटाळ वय 19, रा. रायगाव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एम.एच.11 सीएक्स 0866 भरधाव वेगात चालवत होता. तर विरुद्ध बाजूने दुचाकी क्र. एम.एच. 11 डी.ई. 2551 वरुन येणारा राहुल मुगुटराव रोकडे वय 19, रा. मर्ढे याच्याशी समोरासमोर धडक होवून अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांच्याही दुचाकींचे नुकसान झाले. त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास तोरडमल करत आहेत.