maharashtra

ट्रक खांबाला धडकून पेटला

वडूथ येथील घटना; खाद्याचे साहित्य जळून खाक

सातारा - लोणंद मार्गावर खाद्याचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रकची धडक महावितरण कंपनीच्या विजेच्या पोलला बसली. त्यामुळे विद्युत प्रवाह ट्रकमध्ये गेल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडूथ ता. सातारा येथे घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली  आहे.

सातारा : सातारा - लोणंद मार्गावर खाद्याचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रकची धडक महावितरण कंपनीच्या विजेच्या पोलला बसली. त्यामुळे विद्युत प्रवाह ट्रकमध्ये गेल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडूथ ता. सातारा येथे घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली  आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडुथ गावानजीक असलेल्या लोणंद मार्गावरुन ट्रक निघाला होता. त्या ट्रकची महावितरणच्या खांबाला जोराची धडक बसली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात घर्षण झाले. त्यात ट्रकमध्ये विद्युतप्रवाह गेला अन काही क्षणातच चालकास समजायच्या आत ट्रकने पेट घेतला. ट्रक पेटल्याने आतमधील चिप्स आणि इतर खाद्याचे साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद तालुका पोलिसांत करण्यात आली आहे.