maharashtra

दमदाटी. शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


एकास दमदाटी. शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास दमदाटी. शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाश मोकाशी वय 43, राहणार वसप्पाची वाडी, तालुका सातारा हे शिपाई म्हणून गुरुकुल स्कूल, शाहूनगर सातारा येथे कर्तव्य बजावत असताना तोफिक बरकतुल्ला शेख राहणार कोंडवे, तालुका सातारा हा लपून-छपून फोटो काढत होता. म्हणून मोकाशी यांनी त्यास त्याबाबत विचारणा केली असता शेख याने मोकाशी यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.