maharashtra

जिल्ह्यातील चार दारू अड्ड्यांवर छापे


जिल्ह्यातील चार दारू अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी 6 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सातारा : जिल्ह्यातील चार दारू अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी 6 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गंगापूर तालुका सातारा गावच्या हद्दीत अंगापूर ते देगाव जाणाऱ्या रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सागर विजय राठोड वय 21, रा. अपशिंगे, ता. सातारा हा अवैध दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 3 हजार 675 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत नांदल तालुका फलटण गावच्या हद्दीत सूर्योदय हॉटेलच्या आडोशाला दत्तात्रय वसंत तरडे वय ४१, रा. मलवडी, ता. फलटण हा दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून सातशे रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या घटनेत येळेवस्ती, पाडेगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत सायबु दगडू येळे वय 50 हा राहत्या घराच्या आडोशाला दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 980 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चौथ्या घटनेत बीबी, ता. फलटण गावच्या हद्दीत बौद्ध वस्तीतील राहत्या घराच्या आडोशाला आशाबाई जनार्दन साळवे वय 65, रा. बीबी, ता. फलटण ही महिला अवैध दारू विक्री करताना आढळून आली. त्यांच्याकडून 770 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.