घरात घुसून एकास मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : घरात घुसून एकास मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
दिनांक 12 सप्टेंबर रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रामचंद्र भोसले वय 63 राहणार शिरंबे तालुका कोरेगाव यांच्या घरात घुसून तेथीलच अतुल कबीर भोसले याने विठ्ठल भोसले यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी फळीने मारहाण केली. याबाबतची फिर्याद रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस हवालदार माने अधिक तपास करीत आहेत.


