महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा बँकेतील अंतर्गत सेवकांच्या बदल्यांमुळे अस्वस्थता

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले असून मुख्य कार्यालयामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे सेवकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या विभाग अंतर्गत करण्यात आल्या असून यामध्ये तोंड बघून बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वाढती अस्वस्थता आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष

कॉरिडोरच्या कार्यक्षेत्रावरून माण तालुक्यामध्ये आणि उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये गटा-तटाचा राजकीय वादंग सुरू आहे. याचे साद-पडसाद आगामी सातारा जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

पाऊस व वाऱ्यामुळे झेंडूचे फड भुईसपाट

लागवडी पासून पाऊस आणि ढगाळ वातावराणामुळे खटाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. सुर्यप्रकाशाअभावी बागा फुलल्या नसल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या चिंतेने शेतकरीवर्ग ग्रासला असून बुधच्या काही भागात पाऊस व वार्‍यामुळे अनेक झेंडूचे फड झोपले असून झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी आज येथे केले.

esahas.com
महाराष्ट्र

शरदराव चव्हाण यांचे निधन

साताऱ्यातील मोती चौकातील समाधान वॉचचे मालक व सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन शरदराव शंकरराव चव्हाण उर्फ काका ( वय 94) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

esahas.com
महाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘पवार शिक्षण संस्था’ करा

रयत शिक्षण संस्थेतील कारभारावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘पवार शिक्षण संस्था करा,’ अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा यावरती बोललं पाहिजे, असा सल्ला उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

1 कोटी 39 लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करण्यात यावा!

एचडीएफसी बँक कर्मचारी कौशिक भारत पाटील, मंदार कुलकर्णी, एजंट अमर मतकर या तिघांनी सुमारे 1 कोटी 39 लाखांची आर्थिक फसवणूक केली असून या फसवणुकीचा तपास लवकरात लवकर लागावा तसेच बँकेसही मी सहआरोपी करणार असल्याचे प्रतिपादन कांतीलाल सुरेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.

esahas.com
महाराष्ट्र

फलटण येथे पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

सातारा पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले पोलिस हवालदार आबा बाबूराव काळे (वय 34, रा.गोळीबार मैदान, सातारा) यांनी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेतो, असे म्हणून धमकी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

सातारा शहरालगत महामार्गावर कंटेनरची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात विनोद बबन भोसले (वय 38, रा. तांबे रेवडे ता.कोरेगाव) हे ठार झाले.