फलटण शहर परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : फलटण शहर परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अर्कशाळेच्या समोर पार्क केलेली होंडा शाईन ही दुचाकी क्रमांक एमएच 11 बीआर 2729 ही अज्ञाताने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद अशोक सिताराम वरे वय 59, रा. पवारवाडी, ता. फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पो. हवा. वीरकर करीत आहेत.


